Breaking News

सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षा बेरोजगारी व शेतकऱ्यांबद्दल खोस पाऊले उचलले नाही

 काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, भंडारा : महाराष्ट्र सरकारने १० मार्च रोजी राज्य अर्थसंकल्प सादर केला. सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली. आता मात्र फेरतपासणी करून त्यांना अपात्र ठरविले जात आहे. व विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 

मात्र, या अर्थसंकल्पात वाढीव रकमेचा उल्लेख नाही. तसेच राज्यातील महिला सुरक्षेच्या उपायोजनांवर सरकारने भरत दिलेला नाही. शेतकऱ्यांसाठीही कोणताही ठोस विचार केलेला नाही. नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा व उत्पादन खर्चाच्या वाढीमुळे शेतकरी अडचणीत आहेत. राज्यात दिवसेंदिवस महागाई वाढत असून रोजगार व उद्योग क्षेत्रातही कोणतीही ठोस तरतूद नाही. अशी प्रतिक्रिया भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष पवन मस्के दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत